Skip to main content

Aatmnirbhar Bharat 2020 | आत्मनिर्भर भारत | Bharat Navnirman | best article in marathi


#VocalForLocal   #DigitalIndia     #Swadeshi     #BeIndianBuyIndian



  आत्मनिर्भर भारत 


          निसर्गाकडे लक्ष्य दिले तर एक बाब लक्षात येते कि , एक सजीव प्राणी दुसऱ्या सजीव प्राणी निर्माण करतो , तसेच दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो नंतर मात्र हा नवीन सजीव आत्मनिर्भर होतो व स्वतंत्र पने जगू लागतो.
                    प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेवर एक नजर टाकल्यास प्रामुख्याने एक बाब  लक्षात येते कि प्राचीन खेडी (छोटे गाव ) हि स्वयंपूर्ण होती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हि कि , त्यांच्या सर्व गरजा  ह्या त्यांच्या खेड्यातच पूर्ण व्हायच्या. हि गवे इतरांवर अवलंबून व परावलंबी मुळीच नव्हती . मुळात यालाच आपण आत्मनिर्भरता असे म्हणू शकतो . पण काळाच्या ओघात शासनव्यवस्था बदलत गेली आणि हि स्वयंपूर्ण असलेली खेडी पुढे परावलंबी बनत गेली . यालाच आपण गुलामगिरी म्हणू शकतो , आणि एकदा का आपण गुलाम झालो कि आपली अस्मिता , विद्वत्ता व कचरा यात थोडाही फरक मात्र उरत नाही . जे मालक म्हणेल तेच गुलामला करावं लागते आणि तिथेच आपली प्रगती थांबते . आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर , आपण जगाच्या तुलनेत का मागे पडत गेलो याचे वरील कारण लक्षात येते. महाराष्ट्र राज्यापेक्षाही लहान असलेले काही देशांची प्रगती हि भारतासारख्या मोठ्या देशांपेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आहे . आपण त्यांच्या तुलनेत खूप मागे आहोत याचे कारण आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय.

                               हे चित्र बदलणे गरजेचे आहे , पण त्याच्यासाठी काही प्रयत्न झाले नाही किंवा केल्या गेले नाही असे मात्र नाही , प्रयत्न झाले .  देशांतर्गत अन्यधान्याच्या बाबतीत हरितक्रांती झाली व आपण अन्यधान्याच्या 
बाबतीत स्वयंपूर्ण झालो हेच नाही तर आपण शेतमालाची निर्यात पण करीत आहोत , देश या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पण शेतकरी राजा मात्र तसाच राहिला. त्याची परिस्थिती बदलली नाही, हे असले उलटे चित्र पाहावयास मिळते. याचे एक कारण म्हणजे शेती करण्याची तीच पारंपरिक पद्धत , शेतीमालास मिळणारा कमी भाव , तसेच दलालांकडून होणारी पिळवणूक , व त्याची आधुनिकतेकडे जाण्याची भीती तसेच जागृकतेचा अभाव , नवीन तंत्राद्यानाचा अभाव अश्या कित्येक गोष्टी कारणीभूत आहेत . शेतकरी स्वयंपूर्ण झाला तर खेडीगावे पूर्णपणे स्वयंपूर्ण होतील व याच क्रमाने तालुका , जिल्हा , राज्य आणि देश सुद्धा आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करील. कारण भारत देश हा कृषिप्रधान देश आहे व आजही  जवळपास ८०% जनता ग्रामीण भागातच राहते.

                                 भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण तंत्रध्यानासाठी बाहेरील देशांवर जास्त अवलंबून होतो . आपले काही उपग्रह आपण या मित्रदेशाच्या मदतीने अवकाशात सोडले. नंतर भारतीय वैधन्यानिकांनी आपले तंत्राद्यान विकसित केले व आज आपण इतर देशांचे उपग्रह आपल्या तंत्रध्यानाने अवकाशात सोडतो आहे . सोबतच आपले मंगळयान मंगळाभोवती धिरट्या घालत आहे . तसेच चांद्रयान सफल झाले आणि आपले अनेक  कुत्रिम उपग्रह यशस्वी काम करीत आहे . आणि आजच्या घडीला आपण अवकाश संशोधनात परराष्ट्रावर अवलंबून नाही. आपण आपले स्वतःचे तंत्रध्यान विकसित केले आहे हि झाली आपली अवकाश संशोधनातील आत्मनिर्भरता. 
                   
                  भारताच्या शेजारी राहून काही देश आपल्याशी शत्रुत्व ठेवून वागत आहेत . अनेक वेळा युद्धाचे प्रसंगही घडले . कधी विजय तर कधी पराजयही पत्करावा लागला. याचे कारण म्हणजे आपण युद्ध तंत्राद्यानाच्या बाबतीत दुसऱ्या राष्ट्रांवर अवलंबने . सैनिक आपले पराक्रम दाखवतात , पण कमतरता फक्त त्यांच्या हातात नसलेली आधुनिक शास्तात्रे .  आणि म्हणूनच भारताने यशस्वी अनूपरीक्षण केले व जगाला दाखवून दिले कि आम्ही सुद्धा अणुविध्न्यानात परिपूर्ण आहोत .आज भारताजवळ अणुबॉम्ब सारखे क्षेपणास्त्रे आहेत . आणि म्हणून आज भारतावर वाकडी नजर ठेवणे म्हणजे काही सोपी बाब नाही हे या देशांना कळून चुकले आहेत . पण तरीही हेलिकॉप्टर , युद्धनौका , लढाऊ विमाने यांसाठी दुसऱ्या देशांवर आपण अवलंबून आहोत म्हणजे यांपैकी आपण काही बनवत नाही असे नाही , फक्त याबाबतीतल्या तंत्राद्यानात थोडं मागे पडतो . म्हणून परिणामी थोडं या क्षेत्रात आपण मागे पडतो ,म्हणून या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर आहोत असं म्हणता येणार नाही .यासाठी सरकार , इंजिनीयर , वैद्यानिक राबत आहेत पुढे चालून त्यात प्रगती होईल हे निश्चित .

                      आता महत्वाची गोष्ट म्हणजे औद्योगिक क्षेत्र , आजघडीला भारत देशात अनेक परकीय कंपन्या आहेत ,ज्या आपले उत्पादन खूप जास्त नफ्याने विकत आहेत व मिळालेला पैसे स्वतःच्या देशात नेट आहे. हि आपली आर्थिक गुलामी म्हणावं लागेल . कारण गुंतवणूक त्यांची , नफा त्यांचा , व्यापार त्यांचा , परिणामी आर्थिक सत्ता त्यांची . ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठीच भारतात अली होती पण पुढे सत्ताधीश झाली हा इतिहास आपल्याला फार काही जुना नाही. म्हणून हि आर्थिक गुलामी आपल्याला तोडायची आहे . त्यासाठी स्वदेशी हा एकमेव उपाय फार चांगला म्हणता येईल . स्वदेशी कंपनीचा माल  वापरणे , स्वदेशी गुंतवणूकदारांना कारखाने सुरु करण्यास अर्थसाहाय्य करणे, आणि प्रदेशी मालावर बहिष्कार अश्याप्रकारची जनजागृती करणे आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्यालाच म्हणजे भारतीय लोकांनाच एक पाऊल पुढे घेणे आवश्यक आहे .तेव्हाच आपण आत्मनिर्भर होऊ .आणि यासाठी भारतीय लोकांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे आपल्या छोट्याश्या प्रयत्नातूनच हा भारत देश आत्मनिर्भर म्हणून घडणार आहे , विकसित होणार आहे. 

                               खरं तर आत्मनिर्भरतेचि सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी . लहानपणी तर आपण सर्व गोष्टींसाठी आपल्या पालकांवर अवलंबून होतो , पण पुढे  तर आपण स्वावलंबी झालोच न.

     "केल्याने होत आहे रे | 
            आधी केलेची पाहिजे || "

   नुसते नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करून एक पाऊल याकडे वळवू  शकतो.त्यामुळे इतर लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होईल . आत्मनिर्भरतेतून विकास आणि विकासातून आत्मनिर्भरता वाढेल सोबतच आत्मसम्मान सुद्धा उंचावण्यास मदत होईल . यामुळेच आपल्या देशाचे जगात मौल वाढेल आणि सोबतच वैभव सुद्धा . प्रत्येक व्यक्तीने जर निश्चय केला , तर तो दिवस दूर  नाही जेव्हा जगात भारताने खूप उंची गाठलेली असेल. 


            चला तर, एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे उचलुया , आणि आपण आपल्या देशासाठी काहीतरी योगदान करूया . याच विषयास अनुसरून भारतीय लोकांनी , भारतातच , भारतीय लोकांकरिता भारत नवनिर्माण हे मोबाइल अप्लिकेशन निर्माण केले आहे , ज्यात फक्त आणि फक्त स्वदेशी कंपनी ने बनविलेले विविध प्रकारचे उत्पादने आहेत .  त्यावरून आपण स्वदेशी वस्तू विकत सुद्धा घेऊ शकतो . आज आपल्याला अश्याच अप्लिकेशन ची फार फार गरज आहे . आणि टीम इन्व्हेंटो ने भारतासाठी बाजारात आणलेले हे आत्मनिर्भर बनण्यासाठी उपयुक्त असलेले भारत नवनिर्माण अँप . 


                                                                        👇👇👇

                                BHARAT NAVNIRMAN




बघा आणि आपल्या मोबाइलला मध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि याचा नेहमी नेहमी उपयोग घेऊन फक्त स्वदेशी उत्पादनांना प्रतिसाद द्या .



                                                       MADE IN INDIA WITH PRIDE



                                                                                                         ~  Rupam S. Mankar





                                                      "Sarre jahan se accha 
            
                                                                 Hindustan hamara "


                    





Comments

The Most Populer

Random Captcha Generator

 How to generate random captcha || JAVASCRIPT techinc Here, you will going to teach how to generate random captcha by javascript #CODE: <!DOCTYPE html>     <html>         <head>             <title></title>         </head>         <body>             <canvas width=150 height=70 style="border:1px solid black;"></canvas><br>             <button style="width:150px;             height:40px;             color: red;             -webkit-tap-highlight-color:rgba(0,0,0,0);" onclick="generateCaptcha()">Generate Captcha</button>             <style type="text/css">                 body{     ...

Sidebar Icon | The Icon Interaction

 Sidebar icon with animation || Icon interaction HTML  Here is the code for designing an animation of the sidebar icon. This icon is helpful for the use of sidebar menus . With the effect of rounding opening and closing codoblog brings the video of the icon interaction for you. #CODE :        <!DOCTYPE html> <html> <head> <title>Icon menu</title> <style type="text/css"> body{ height: 100vh; display: flex; justify-content: center; align-items: center; margin: 0; font-family: sans-serif; font-weight: bold; flex-direction: column; } p{ font-size: 2.5rem; text-transform: uppercase; } svg{ stroke-linecap: round; stroke-linejoin: round; transition: transform 400ms; cursor: pointer; -webkit-tap-highlight-color:rgba(0,0,0,0); } svg path{ fill: none; stroke: black; stroke-width:2px; transition:stroke-dasharray 400ms,stroke-dashoffs...

Code for icon design | camera icon code | html-css code

 Camera ICON creation || Code for the camera icon  Here is the code for camera icon design..try with your efforts..! ICON #CODE : >>                <!DOCTYPE html> <html> <head> <title>Camera Icon Creation</title> <style type="text/css"> body{ margin:0; background-color: lightblue; } .outer{     width: 50%;     height: 100vh;     display: flex;     justify-content: center;     align-items: center;     margin: 0 auto; } .body{     background-color: white;     border-radius: 30%;     width: 11rem;     height: 11rem;     position: relative;     box-shadow: 1px 1px 6px 1px slategrey; } .red{     border-radius: 50%;     background-color: crimson;     width: 10px;     height: 10px;     position: absolute;     ...